कराड येथे वाहनासह ७ लाख रुपयांचे अवैध मद्य शासनाधिन !

कराड पोलिसांनी मलकापूर येथे बैलबाजार रस्त्यावरील गोकाक पेट्रोलपंपाजवळ चारचाकी बोलेरो गाडीतून ७ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य कह्यात घेतले. या प्रकरणी ऋषिकेश दिलीप कणसे यांना कह्यात घेण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तूट !

विद्यापिठाच्या वतीने आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सादर केला. या वेळी कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते.

सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे ‘नव महाराष्ट्र संघ गणेश मंडळा’ने  साजरी केली आदर्श होळी !

येथे होळी झाल्यावर दुसर्‍या दिवशी येणार्‍या-जाणार्‍या दूधवाल्यांकडून अडवून दूध घेणे, दूध न दिल्यास त्रास देणे अशी चुकीची प्रथा रूढ झाली होती. मुलांचे या संदर्भात प्रबोधन केल्यावर त्यांनी ही प्रथा बंदी केली आणि यासाठी श्री. नवनाथ कावळे यांनी दूध उपलब्ध करून दिले.

पुण्यातील प्राचीन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील ३ देवतांच्या मूर्तींची चोरी !

देवतांच्या दागिन्यांसह आता देवतांच्या मूर्तींचीही सहजपणे चोरी होत आहे, ही स्थिती पोलिसांना लज्जास्पद ! हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण होण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे वैध मार्गाने पोलिसांवर दबाव आणणे आवश्यक !

पुण्यातील खडकवासला जलाशयाचे प्रदूषण रोखण्यात १०० टक्के यश !

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी आयोजित केले जाणारे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ सलग २२ व्या वर्षीही १०० टक्के यशस्वी झाले.

अमेरिकेच्या सुपरसॉनिक विमानांना हाकलून लावल्याचा रशियाचा दावा !

रशियाने दावा केला आहे की, त्याच्या ‘मिग-३१’ या लढाऊ विमानांनी त्याच्या सीमेजवळ आलेल्या अमेरिकी सुपरसॉनिक विमानांना हाकलून लावले आहे.

नेतान्याहू यांना अल्लाकडे पाठवा !

तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी निवडणुकीच्या प्रसारसभेत ‘इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अल्लाकडे पाठवा’ असे विधान केल्यानंतर इस्रायलने तुर्कीयेमधून त्याच्या राजदूतांना परत बोलावले आहे.

तमिळनाडूतील द्रमुक सरकारच्या मंत्र्याने पंतप्रधान मोदी यांना केली शिवीगाळ !

भारताच्या पंतप्रधानांना शिवीगाळ करणार्‍यांची मनोवृत्ती किती खालच्या दर्जाची आहे ?, हे लक्षात येते ! याचा निषेध अन्य राजकीय पक्षांनी केलेला नाही, यात त्यांचे याला समर्थन आहे, असेच लक्षात येते !

Aligarh Mosques Covered : अलीगड (उत्तरप्रदेश) येथे होळीपूर्वी झाकण्यात आल्या ४ मशिदी !

मशिदीवर रंग पडून होणारा संभाव्य वाद टाळण्यासाठी मशीद समितीचा निर्णय ! वर्षातून एकदा किरकोळ रंग उडाल्याचेही सहन करू न शकणारे कधीतरी हिंदूंसमवेत बंधूभावाने राहू शकतील का ?

Ayodhya Holi 2024 : अयोध्येत ४९५ वर्षांनंतर भगवान श्री रामलल्लाने खेळली होळी !

श्रीराममंदिरात पुजार्‍यांनी श्री रामलल्लावर फुलांचा वर्षाव केला. यानंतर त्यांना गुलाल अर्पण करण्यात आला. या वेळी पुजार्‍यांनी होळीविषयी गीते गायली.