तुर्कीयेच्या राष्ट्राध्यक्षांचे विधान !
कोणताही देव हमासच्या मित्रांचे ऐकणार नाही ! – इस्रायलचे रोखठोक प्रत्युत्तर
अंकारा (तुर्कीये) – तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी निवडणुकीच्या प्रसारसभेत ‘इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अल्लाकडे पाठवा’ असे विधान केल्यानंतर इस्रायलने तुर्कीयेमधून त्याच्या राजदूतांना परत बोलावले आहे.
इस्रायलचे परराष्ट्रमंत्री कॅट्झ यांनी तुर्कीयेच्या राजदूताला कार्यालयात बोलावून जाब विचारला. यासह कॅट्झ यांनी एर्दोगन यांना संदेश पाठवला आहे. त्यात लिहिले आहे की, तुम्ही मुलांना जाळण्याचे, हमासच्या खुनी आणि बलात्कारी यांचे समर्थन करता. तुम्हाला देवाविषयी बोलण्याचा अधिकार नाही. क्रूर हमासच्या मित्रांचे कोणताही देव ऐकणार नाही.
Send Netanyahu to Allah !
– Turkiye President's Statement sparks outrage !No God will listen to the friends of #Hamas ! – Israel's apt reply
Ankara (Turkiye) – #Israel recalls its ambassador from Turkiye after Turkiye's President Recep Tayyip Erdogan's controversial remark in… pic.twitter.com/88NljFPBY1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 25, 2024