Aligarh Mosques Covered : अलीगड (उत्तरप्रदेश) येथे होळीपूर्वी झाकण्यात आल्या ४ मशिदी !

मशिदीवर रंग पडून होणारा संभाव्य वाद टाळण्यासाठी मशीद समितीचा निर्णय !

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे मशिदींवर होळीचा रंग पडू नये आणि त्यामुळे कोणताही संभाव्य वाद निर्माण होऊ नये, यासाठी संवेदनशील भागांत असलेल्या ४ मशिदी काळ्या ताडपत्री लावून झाकण्यात आल्या आहेत. शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मशिदी काळ्या ताडपत्रीने झाकण्याचा निर्णय प्रशासन आणि मशीद समिती यांनी संयुक्तपणे घेतला.

मशीद समितीचे सदस्य अकील पहेलवान म्हणाले की, होळीच्या उत्सवामुळे आम्ही या मशिदी झाकतो. गेल्या ५-६ वर्षांपासून या मशिदी होळीच्या वेळी झाकल्या जातात. शहरांमध्ये अनेक मशिदी आहेत, ज्या होळीच्या आधी झाकल्या जातात. या कामात आम्हाला प्रशासनाने सहकार्य केले. प्रशासनाच्या उपस्थितीत आम्ही पोलिसांच्या नेतृत्वाखाली मशिदी झाकल्या, जेणेकरून होळी साजरी करतांना कोणतीही अडचण येऊ नये.

संपादकीय भूमिका

  • वर्षातून एकदा किरकोळ रंग उडाल्याचेही सहन करू न शकणारे कधीतरी हिंदूंसमवेत बंधूभावाने राहू शकतील का ?
  • ‘हिंदूंनीचआम्हाला इफ्तारची मेजवानी द्यावी, मंदिरात नमाजपठणासाठी जागा द्यावी आणि तथाकथित बंधूभाव जपावा’, असेच त्यांना वाटते, हे हिंदूंना कधी लक्षात येणार ?