Iran Israel Tension : आमच्यावरील आक्रमणामागे इस्रायलचा हात असल्याचा अद्याप पुरावा नाही ! – इराण

पुरावा सापडल्यास इस्रायलला धडा शिकवण्याची धमकी

Mainpuri Accident : मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथील भीषण अपघातात ४ महिला ठार !

नामकरण सोहळ्याला उपस्थित राहून परतलेले महिला-पुरुष हे या ट्रॉलीतून प्रवास करत होते. वाटेत हा अपघात झाला.

Elon Musk Postpones India Visit : इलॉन मस्क यांनी भारत दौरा पुढे ढकलला

‘‘टेस्लामधील माझ्या दायित्वामुळे मला माझा भारत दौरा पुढे ढकलावा लागला, हे दुर्दैवी आहे; पण मी या वर्षीच भारताला भेट देण्याची संधी पहात आहे.’’

Goa Lineman Death : डिचोली (गोवा) येथे वीज कर्मचार्‍याचा विजेचा धक्का बसून मृत्यू

एका फिटनेस कारखान्याचा इनव्हर्टर चालू झाल्यामुळे त्याचा वीजप्रवाह वीज कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणापर्यंत आला. त्यामुळेच वीज कर्मचार्‍याचा मृत्यू झाला, असे स्पष्टीकरण चौकशीअंती वीज खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी दिले आहे.

गोवा : बांधकामाचे ठिकाण रहाण्यास अयोग्य असल्यावरून गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून कारवाई

बाल हक्क संरक्षण आयोग गंभीर घटना घडल्यावर पहाणी करण्याऐवजी आधीच बांधकामाच्या ठिकाणाची पहाणी करू शकत नाही का ? एका ५ वर्षीय मुलीने जीव गमावल्यावर जागे होऊन काय उपयोग ?

‘गॅरेंटी’ (हमी) देण्यासाठी पुष्कळ धैर्य लागते ! – पंतप्रधान मोदी

आम्ही घराघरात वीज दिली, पाण्याची जोडणी दिली, ४ कोटी गरिबांना घरे दिली. ५० कोटींहून अधिक जण अधिकोषाला जोडले गेले. २५ कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढले.

समीर वानखेडे प्रकरणी चौकशीतून काय निष्पन्न झाले ? – मुंबई उच्च न्यायालयाची एन्.सी.बी.ला विचारणा

एन्.सी.बी.ने पाठवलेल्या नोटिसांना वानखेडे यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. याचिका प्रलंबित असल्याने कठोर कारवाई करणार नसल्याची एन्.सी.बी.ची हमी यापुढेही कायम रहाणार आहे.

पुण्याचा पारा ४३.५ अंशांवर; शहरात उन्हाच्या झळा वाढल्या !

पुणे शहराचे सर्वाधिक तापमान एप्रिलमध्ये ४२.८ इतके आहे; मात्र १८ एप्रिलला हडपसरचे कमाल तापमान ४३.५, वडगाव शेरी ४३.१, कोरेगाव पार्क ४३ अंशांवर पोचले होते, तर शिवाजीनगरचा पारा ४१ अंशांवर होता. अन्य सर्व भागाचे तापमान ४२ अंशांवर गेले होते.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी नाव मागे घेतले !

उमेदवारांच्या स्पर्धेतून नाव मागे घेतांना उमेदवारीला विलंब होत असल्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. त्यामुळे धोका टाळण्यासाठी स्वत:चे नाव मागे घेत असल्याचे भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

महाराष्ट्रात मतांसाठी मद्याचे प्रलोभन, आचारसंहितेच्या काळात ४ सहस्र २५५ गुन्हे नोंद !

मतदारांना मद्य आणि अमली पदार्थ यांचे आमीष दाखवणे अन् त्यातून उमेदवार निवडून येणे ही व्यवस्थेची थट्टा !