नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी नाव मागे घेतले !

छगन भुजबळ

मुंबई – नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीच्या स्पर्धेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांचे नाव मागे घेत असल्याचे १९ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषद घेऊन घोषित केले. निवडणुकीला काही दिवस शिल्लक असूनही अद्याप नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. उमेदवारांच्या स्पर्धेतून नाव मागे घेतांना उमेदवारीला विलंब होत असल्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. त्यामुळे धोका टाळण्यासाठी स्वत:चे नाव मागे घेत असल्याचे भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. शिवसेनेकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.