पुरावा सापडल्यास इस्रायलला धडा शिकवण्याची धमकी
तेहरान – आमच्यावर १९ एप्रिलला झालेल्या आक्रमणामागे इस्रायलचा हात असल्याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही. तथापि पुरावा सापडल्यास इस्रायलला धडा शिकवू, अशी धमकी इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीराब्दोल्लाहियन यांनी दिली. इराणच्या या धमकीविषयी इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
इराणमधील इस्फहान या शहरात १९ एप्रिल या दिवशी ड्रोनद्वारे आक्रमण झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. याविषयी हुसेन म्हणाले की, लहान मुले खेळतात, तसे हे ड्रोन होते. हे ड्रोन आमच्याच देशामधून उडवण्यात आले होते. ते आमच्या सुरक्षा रक्षकांनी पाडले.