पुण्याचा पारा ४३.५ अंशांवर; शहरात उन्हाच्या झळा वाढल्या !

प्रतिकात्मक चित्र

हडपसर (जिल्हा पुणे) – शहरातील कमाल तापमानाचे सर्व विक्रम मोडत १८ एप्रिलला हडपसर भागाचे कमाल तापमान राज्यात सर्वोच्च ४३.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. उन्हाची तीव्रता इतकी होती की, पुणेकर दिवसभर घामाने चिंब झाले. रात्री १२ वाजता पुण्याचे किमान तापमान २९ अंश सेल्सिअसवर गेले होते. किमान तापमानात वाढ झाल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. हे हंगामातील सर्वाधिक तापमान आहे. पुणे शहराचे सर्वाधिक तापमान एप्रिलमध्ये ४२.८ इतके आहे; मात्र १८ एप्रिलला हडपसरचे कमाल तापमान ४३.५, वडगाव शेरी ४३.१, कोरेगाव पार्क ४३ अंशांवर पोचले होते, तर शिवाजीनगरचा पारा ४१ अंशांवर होता. अन्य सर्व भागाचे तापमान ४२ अंशांवर गेले होते.