Elon Musk Postpones India Visit : इलॉन मस्क यांनी भारत दौरा पुढे ढकलला

‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

वॉशिंग्टन – इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार्‍या ‘टेस्ला’ या अमेरिकेतील प्रसिद्ध आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांचा नियोजित भारत दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. इलॉन मस्क यांनीच हा दौरा काही काळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

मस्क हे २२ एप्रिलला भारतात येणार होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. इलॉन मस्क यांनी ‘एक्स’द्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘टेस्लामधील माझ्या दायित्वामुळे मला माझा भारत दौरा पुढे ढकलावा लागला, हे दुर्दैवी आहे; पण मी या वर्षीच भारताला भेट देण्याची संधी पहात आहे.’’

(सौजन्य : India Today)

‘टेस्ला’ महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये करणार गुंतवणूक !

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्य सरकारांनी प्रस्तावित वाहननिर्मिती प्रकल्पांसाठी ‘टेस्ला’ला भूमी देऊ केली आहे. या प्रकल्पांद्वारे ‘टेस्ला’च्या इलेक्ट्रिक वाहनांची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मागणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.