महाराष्ट्रातील श्री गणेशाच्या वैविध्यपूर्ण ठिकाणांचे माहात्म्य !

वाई (जिल्हा सातारा) येथे कृष्णा नदीच्या किनार्‍यावर हे देवस्थान आहे. उत्तम प्रतीच्या घडीव दगडापासून हे मंदिर बनवले आहे.

श्री गणेशअथर्वशीर्षाचे महत्त्व !

‘थर्व’ म्हणजे हालणारे आणि अथर्व म्हणजे ‘न हलणारे शीर्षम्’ । सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेले मस्तक ! अथर्वशीर्षाचे पठण केले की, बुद्धी आणि मन स्थिर होते, अशी गणेश उपासकांची श्रद्धा असते.

शुभकार्यारंभी गणेशपूजन !

‘कोणत्याही शुभकार्यात प्रथम गणपतीचे पूजन केले जाते. मग भले घराची पायाभरणी असो, वास्तूपूजन किंवा लग्नकार्य असो अथवा आणखी कोणताही शुभ प्रसंग असो !

श्री गणेशरूप परिचय !

‘श्री गजानन’ हा आपल्या चारही वेदांचा समावेशक शब्द आहे. जसे ‘ऋग्’मधील ‘ग’, ‘युज’मधील ‘ज’ आणि सामन् आणि अयर्वन् मधील ‘न’, ‘न’ मिळूनच ‘गजानन’ शब्दाची घडण झालेली आहे.

गणेशाशी संबंधित काही उपासना !

संकटनाशासाठी कुणी श्री गणेशोपासनेची कास धरतो, तर कुणी मनोकामना पूर्तीसाठी, काही मनःशांतीसाठी किंवा विशिष्ट हेतू किंवा ईप्सित साध्य करण्यासाठी गणेशाची साधना करतात; मात्र साधकाच्या ठिकाणी चिकाटी, संयम, श्रद्धा आणि निष्ठेची आवश्यकता असते.

शक्तीरूपी संवेदना !

‘श्री गणेशाचे कार्य शिवापासून आरंभ होते, म्हणजे ते शिवतत्त्वाशी संबंधित आहे. शिव म्हणजे शांती. श्री गणेश म्हणजे निवृत्ती प्रदान करणारी, आत्मशांतीला गती देणारी शक्तीरूप संवेदना, जी ज्ञानब्रह्म, शब्द-निःशब्द ब्रह्म, ब्रह्मस्वरूप आहे.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी श्री गणेशाला साकडे घाला !

श्री गणेशाचा आदर्श समोर ठेवून आपणही हिंदु धर्मप्रसार करून सर्वांना धर्मज्ञान देऊया आणि साधनेने स्वतः सात्त्विक बनून इतरांना मंगलता प्रदान करूया. हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी वीरश्री जागृत ठेवूया.

पहिले नमन गणरायाला !

एकदा स्वर्गातील देवदेवता आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या म्हणण्यानुसार पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा करण्यास निघाले. गणपतीने आपल्या युक्तीचातुर्याने शास्त्राप्रमाणे आपले माता-पिता यांना ७ प्रदक्षिणा घालून सर्वप्रथम पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि अग्रपूजेचा मान मिळवला.

श्री गणेशाच्या प्रसिद्ध १२ नामांची वैशिष्ट्ये !

‘सुमुखश्र्चेकदंतश्र्चय कपिलो गजकर्णकः । लंबोदरश्र्च विकटो विघ्ननाशो गणधिपः ।।
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः । द्वादशैतानि नामानि य पठेच्छ्णुयादपि ।।’

गणेशतत्त्वाचा लाभ होण्यासाठी पुढील गोष्टी करा !

‘ॐ गँ गणपतये नमः’ हा नामजप गणेशोत्सवाच्या काळात अधिकाधिक करावा.