ऋषीजगताचे अनन्यसाधारण महत्त्व आणि माहिती !

आज ऋषिपंचमी आहे. हिंदु धर्मानुसार मनुष्यजन्मातील ४ ऋणांपैकी ऋषिऋण हे एक महत्त्वाचे ऋण समजले जाते. त्या निमित्ताने ऋषींविषयी माहिती, कार्य आणि त्यांचे महत्त्व समजून घेऊया.

गणेशोत्सव ते हिंदु राष्ट्र : लोकमान्य टिळक यांचा द्रष्टेपणा !

गणेशोत्सव मिरवणुकीतून परत आल्यावर लोकमान्य टिळक यांच्या संपादकीय लेखामुळे स्वातंत्र्यचळवळीत एक अध्याय चालू झाला आणि त्यातून स्वातंत्र्य चळवळीचे अनेक उपक्रम उभे राहिले.

सार्वजनिक गणेशोत्सवात ओंगळवाणे प्रकार न करता आध्यात्मिक विकास साधा !

सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य राखता येत असेल आणि त्यामागील प्रयोजन लक्षात आले असेल, तरच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करा. तो यथोचितपणे साजरा करणे जमत नसेल, तर बंद करा !

श्री गणेशाला ‘लाल गुलाब’ किंवा ‘फिकट गुलाबी जास्वंद’ वहाण्यापेक्षा धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘लाल जास्वंद’ वहाणे उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असणे !

‘अध्यात्मशास्त्रानुसार देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण केली जातात, उदा. श्री गणेशाला लाल जास्वंद आणि दूर्वा आदी. याचे कारण हे की, त्या त्या वस्तूमध्ये त्या त्या देवतेचे तत्त्व (चैतन्य) आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते. यासंदर्भातील एक संशोधन पुढे दिले आहे.

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या श्री गणेशमूर्ती मातीची असावी !

अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती चिकणमातीपासून अथवा शाडूच्या मातीपासून बनवलेली असावी. ती नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे श्री गणेशाची स्पंदने मूर्तीकडे आकृष्ट होतात आणि प्रदूषणही होत नाही.

महाराष्ट्रातील श्री गणेशाच्या वैविध्यपूर्ण ठिकाणांचे माहात्म्य !

वाई (जिल्हा सातारा) येथे कृष्णा नदीच्या किनार्‍यावर हे देवस्थान आहे. उत्तम प्रतीच्या घडीव दगडापासून हे मंदिर बनवले आहे.

श्री गणेशअथर्वशीर्षाचे महत्त्व !

‘थर्व’ म्हणजे हालणारे आणि अथर्व म्हणजे ‘न हलणारे शीर्षम्’ । सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेले मस्तक ! अथर्वशीर्षाचे पठण केले की, बुद्धी आणि मन स्थिर होते, अशी गणेश उपासकांची श्रद्धा असते.

शुभकार्यारंभी गणेशपूजन !

‘कोणत्याही शुभकार्यात प्रथम गणपतीचे पूजन केले जाते. मग भले घराची पायाभरणी असो, वास्तूपूजन किंवा लग्नकार्य असो अथवा आणखी कोणताही शुभ प्रसंग असो !

श्री गणेशरूप परिचय !

‘श्री गजानन’ हा आपल्या चारही वेदांचा समावेशक शब्द आहे. जसे ‘ऋग्’मधील ‘ग’, ‘युज’मधील ‘ज’ आणि सामन् आणि अयर्वन् मधील ‘न’, ‘न’ मिळूनच ‘गजानन’ शब्दाची घडण झालेली आहे.

गणेशाशी संबंधित काही उपासना !

संकटनाशासाठी कुणी श्री गणेशोपासनेची कास धरतो, तर कुणी मनोकामना पूर्तीसाठी, काही मनःशांतीसाठी किंवा विशिष्ट हेतू किंवा ईप्सित साध्य करण्यासाठी गणेशाची साधना करतात; मात्र साधकाच्या ठिकाणी चिकाटी, संयम, श्रद्धा आणि निष्ठेची आवश्यकता असते.