१. सात्त्विक पोषाख : ‘पुरुषांनी सदरा, धोतर किंवा पायजमा आणि स्त्रियांनी साडी नेसावी. पुरुषांनी कपाळावर कुंकवाचा टिळा लावावा आणि स्त्रियांनी कुंकू लावावे.
२. भावपूर्ण आरती : आरतीतील शब्दांचा अर्थ समजून घेऊन आरती एका सुरात हळूवारपणे म्हणावी.
३. नामजप : ‘ॐ गँ गणपतये नमः’ हा नामजप गणेशोत्सवाच्या काळात अधिकाधिक करावा.
४. प्रार्थना : गणेशोत्सवाच्या काळात ‘गणेशतत्त्वाचा अधिकाधिक लाभ होऊ दे’, अशी श्री गणेशाला प्रार्थना करावी.’
– एक साधक