शुभकार्यारंभी गणेशपूजन !

‘कोणत्याही शुभकार्यात प्रथम गणपतीचे पूजन केले जाते. मग भले घराची पायाभरणी असो, वास्तूपूजन किंवा लग्नकार्य असो अथवा आणखी कोणताही शुभ प्रसंग असो !

निर्विघ्न गणपतीचे माहात्म्य !

डोळे, कान आणि नाक या आपल्या इंद्रियांनाही ‘गण’ म्हटले जाते. या गणांचा जो पती (स्वामी) (आधारस्वरूप नियामक परमात्मा) आहे, त्याला प्रसन्न केल्यास तुमचे गण ठीकठाक कामे करतील, जीवनात विघ्ने आणणार नाहीत. भौतिक जगाच्या आसक्तीपासून वाचण्यासाठीही श्री गणेशाचे पूजन करा.

– (साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, ऑगस्ट २०२२)