‘सुमुखश्र्चेकदंतश्र्चय कपिलो गजकर्णकः । लंबोदरश्र्च विकटो विघ्ननाशो गणधिपः ।।
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः । द्वादशैतानि नामानि य पठेच्छ्णुयादपि ।।’
वरील श्लोकात श्री गणेशाची १२ नामे प्रसिद्ध आहेत. त्यातून श्री गणपतीचे व्यक्तीरूपक स्पष्ट होते, ते येथे दिले आहे.
१. सुमुख : या नामातून त्याचे मुख सौंदर्यपूर्ण असून ते सर्व इंद्रियांत मुख्य आहे.
२. एकदंत : एकात्मता (एकपणा) दाखवणारा, दुजाभाव न ठेवणारा असा.
३. कपिल : ‘कपि’ अर्थात वानररूप. चंचल मनावर नियंत्रण करणारा.
४. गजकर्ण : गुपित गोष्टीही समजून घेणारा.
५. लंबोदर : आपल्या उदरात सर्वांना सामावून घेणारा.
६. विकट : शक्ती, बुद्धी आणि गुण यांनी प्रचंड असणारा, त्याच्यापुढे सर्वच जण नतमस्तक होतात असा.
७. विघ्नविनाशक : भक्तांच्या संकटांचा नाश करणारा.
८. विनायक : योग्य नायक. नेतृत्व करणारा.
९. धूमकेतू : सर्व धूसर भ्रम, कल्पना आणि संशय नष्ट करणारा.
१०. गणाध्यक्ष : सर्व इंद्रियांचा आणि देवांचा प्रमुख असणारा.
११. भालचंद्र : मस्तकावर चंद्र धारण करणारा, म्हणजेच ज्याचे मस्तक शांत आणि थंड आहे असा.
१२. गजानन : ज्याचे मस्तक हत्तीचे आहे, म्हणजेच हत्तीसारखा शांत, सूक्ष्म आणि दूरदृष्टी असणारा.
– (साभार : ‘हरी-विजय’, दीपोत्सव २००८)