Netflix removes Annapoorani film : हिंदूंच्या विरोधानंतर ‘नेटफ्लिक्स’वरून ‘अन्नपूर्णानी’ चित्रपट हटवला !  

केवळ क्षमा मागून चालणार नाही, तर या चित्रपटाला अनुमती देणारे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आणि निर्माते यांना शिक्षा झाली पाहिजे ! तरच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर वचक बसेल !

हावेरी (कर्नाटक) येथे मुसलमानांकडून एकत्र असणार्‍या हिंदु पुरुष आणि मुसलमान महिला यांना हॉटेलमध्ये घुसून मारहाण !

कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यामुळे धर्मांधांना मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळेच ते गुंडगिरी करू लागले आहेत. काँग्रेसला मते देऊन सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंनी याचा विचार केला पाहिजे !

Meat Pieces In Veg Meal : एअर इंडियाच्या विमानात जैन महिलेच्या शाकाहारी जेवणात मिळाले मांसाचे तुकडे !

वीरा जैन यांनी म्हटले की, एअर इंडियाने केवळ क्षमा मागितली आहे. तथापि हा धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे, याची एअर इंडियाला जाणीव नाही, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

‘आकाश’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) १२ जानेवारीला नव्या मालिकेतील ‘आकाश’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी  ओडिशातील चांदीपूर येथे करण्यात आली.

ED Raids TMC Leaders : बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’च्या धाडी !

‘ईडी’च्या या धाडींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना बंगालचे मंत्री शशी पंजा म्हणाले की, ही कारवाई राजकीय सूडभावनेतून करण्यात आली आहे.

VIDEO : कोलकाता येथील प्रसिद्ध हिंदु नेत्याने केलेल्या कारसेवेचे अद्वितीय अनुभव !

कोलकाता येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन पदाधिकारी आणि ʻभारतीय साधक समाजʼ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिर्बान नियोगी यांनी केलेल्या कारसेवेतील अद्वितीय अनुभव या व्हिडिओतून जाणून घेऊया.

 बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यक्रमात पक्षाचे जिल्हाध्यक्ष सादिक खान यांच्याकडून मंचावरच हनुमान चालिसाचे पठण !

काही जण, म्हणजे धर्मांध मुसलमानच धर्माच्या नावावार उन्माद पसरवण्याचा प्रयत्न गेली अनेक दशके करत आहेत. त्याविषयी खान का बोलत नाहीत ?

श्रीराम हे आमचे आराध्यदैवत असून आम्ही त्यांचे वंशज आहोत ! – काँग्रेसचे नेते इम्रान मसूद

श्रीराम हे आमचे आराध्यदैवत असून आम्ही त्यांचे वंशज आहोत, असे वक्तव्य उत्तरप्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इम्रान मसूद यांनी मेरठमधील काँग्रेसच्या संवाद आणि कार्यशाळा या कार्यक्रमात केले.

आज पंतप्रधानांच्या हस्ते ‘अटल सेतू’चे लोकार्पण !

मुंबईतून नवी मुंबईत जाण्यासाठी वा नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी नागरिकांना दीड ते दोन घंटे द्यावे लागतात; मात्र हा प्रवास या सेतूमुळे केवळ २० ते २२ मिनिटांत होईल.

नाशिक येथे रामकुंडावर गोदावरीची महाआरती करून पंतप्रधान घेणार काळाराम मंदिराचे दर्शन !

मोदी यांचे नाशिक विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथून ते संभाजीनगर रस्त्यावर नीलगिरी बाग येथील मैदानावर हेलिकॉप्टरने उतरणार आहेत. त्यानंतर उपाहारगृह मिर्ची ते संत जनार्दन स्वामी आश्रमापर्यंत त्यांचा ‘रोड शो’ असेल.