संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी एअर इंडियाने उलट महिलेलाच मांसाचे तुकडे आढळल्याचे छायाचित्र हटवण्यास सांगितले !
नवी देहली – एअर इंडियाच्या विमानात एका जैन महिलेच्या शाकाहारी जेवणामध्ये मांसाचे तुकडे दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी महिलेने तक्रार केली आहे. याविषयीची माहिती तिने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली आहे. वीरा जैन असे या महिलेचे नाव आहे. तिने मांसाचे तुकडे असलेल छायाचित्र प्रसारित करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
सौजन्य कनक न्यूज
एअर इंडियाने जैन यांना त्यांनी प्रसारित केलेले छायाचित्र हटवायला सांगत थेट तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे. यावर जैन यांनी म्हटले की, एअर इंडियाने केवळ क्षमा मागितली आहे. तथापि हा धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे, याची एअर इंडियाला जाणीव नाही, अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
Meat pieces found in Jain woman's vegetarian meal in @airindia flight!
Instead of taking action against the concerned, Air India on the contrary asked the woman to delete the picture of the discovered pieces of meat!
It is imperative for the Union government to look into this… pic.twitter.com/tvP0X1LBdh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 12, 2024
संपादकीय भूमिकाकेंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे ! |