सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांच्याप्रती अपार भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील कै. मोहन सुभाषचंद्र लोखंडे (वय ४२ वर्षे) !

‘पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील श्री. मोहन सुभाषचंद्र लोखंडे यांचे ७.२.२०२२ या दिवशी पहाटे ५.३० वाजता दीर्घकालीन आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४२ वर्षे होते. ते २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना आणि सेवा करत होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले इतर संतांप्रमाणे समाजात इतरांना न भेटण्याचे कारण !

मी भेटल्यानंतर स्थळ-काळानुसार फारच मर्यादित लोकांना भेटीचा खरा लाभ होतो. इतरांना न भेटता मी अधिकाधिक वेळ ग्रंथलिखाणाची सेवा करत असतो.

साधक-फूल बनवून आम्हा, द्यावा आपला कृपाशीर्वाद ।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येऊन गेल्यानंतर अधिवक्ता चारुदत्त जोशी यांना सुचलेली कविता

विजयपूर, बागलकोट येथील श्री. मल्लिकार्जुन दळवाई आणि सौ. गीता शिंदे यांना आलेल्या अनुभूती

‘एकदा आम्ही सर्व कुटुंबीय रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेव्हा तेथील साधिकेने आम्हाला सांगितले, ‘‘तुम्हाला संध्याकाळी भावसत्संग आहे.’’ आम्ही सर्वांनी लवकर महाप्रसाद घेतला आणि तिथे गेलो. त्या वेळी ताई म्हणाली, ‘‘हा सत्संग हिंदी भाषेमध्ये आहे. तुमच्यासाठी उद्या सत्संग आहे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नाशिक येथील कै. (श्रीमती) नलिनी बाळकृष्ण विभांडिक (वय ७४ वर्षे) !

२९.३.२०२१ या दिवशी श्रीमती नलिनी बाळकृष्ण विभांडिक यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचा मुलगा श्री. जगदीश विभांडिक आणि त्यांची मुलगी संगीता विभांडिक यांना त्यांच्या निधनापूर्वी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरातील देवतांची चित्रे आणि मूर्ती यांची रचना पालटण्यापूर्वी अन् पालटल्यानंतर सनातनचे साधक आधुनिक वैद्य भिकाजी भोसले यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

तेव्हाचे आणि आताचे ध्यानमंदिर यांच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती . . .

साधकांच्या मनात भावाचे बीज फुलवणारा आणि ईश्वरप्राप्तीच्या वाटेवरील दीपस्तंभ असलेला भाववृद्धी सत्संग !

राष्ट्रीय स्तरावरील भाववृद्धी सत्संगाचा मूळ स्रोत वैकुंठलोक आहे. साक्षात् वैकुंठलोकातूनच श्रीविष्णूच्या चरणी हा भावसत्संग घेतला जातो.

आष्टा (जिल्हा सांगली) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यास अनुमती !

अनुमती न घेता अवैधरित्या पुतळा बसवल्याचे कारण पुढे करत पोलीस प्रशासनाने ३ जानेवारीला सायंकाळी मंडप हटवला होता, तसेच मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही हटवला होता. याच्या निषेधार्थ शिवप्रेमींनी ४ जानेवारीला आष्टा-वाळवा बंदची हाक दिली होती.

जालना येथे साडेचार मासांत २ वेळा राष्ट्रध्वज पालटावा लागला !

येथील रेल्वेस्थानकाच्या समोर १०० फूट उंचीवर डौलाने फडकत असलेला राष्ट्रध्वज फाटलेल्या अवस्थेत दिसत असल्यामुळे राष्ट्रभक्त संतप्त झाले आहेत. १६ ऑगस्ट २०२२ या दिवशी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या ध्वजाचे अनावरण झाले होते.

श्रीरामप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पनवेल ते कल्याण मशाल यात्रेचे आयोजन !

पनवेल येथील कलावंती दुर्ग ते कल्याण येथील दुर्गाडी गड असे ५९ कि.मी. अंतर मशाल यात्रेत सहभागी झालेल्यांनी पार केले. यात्रा दुर्गाडीदेवीच्या मंदिरात पोचल्यावर ‘हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी शक्ती दे’, असा आशीर्वाद मागून सर्वांनी महाआरती केली.