सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांच्याप्रती अपार भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील कै. मोहन सुभाषचंद्र लोखंडे (वय ४२ वर्षे) !

‘पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील श्री. मोहन सुभाषचंद्र लोखंडे यांचे ७.२.२०२२ या दिवशी पहाटे ५.३० वाजता दीर्घकालीन आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४२ वर्षे होते. ते २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना आणि सेवा करत होते. सोलापूर जिल्ह्यातील साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कै. मोहन लोखंडे

१. डॉ. श्रीपाद व्यंकटेश पेठकर (वय ६१ वर्षे), पंढरपूर

१ अ. नम्र : ‘कै. मोहनदादा अत्यंत नम्र होते. ते लहान-थोर सर्वांना हात जोडून नमस्कार करत. ‘स्वतः उच्चशिक्षित (एम.ए., बीएड (मराठी)) असल्याचा त्यांना जराही अभिमान नव्हता. त्यांची प्रत्येक साधकाशी जवळीक होती.

१ आ. प्रांजळपणा : ते स्वतःकडून सेवेअंतर्गत झालेल्या चुका उत्तरदायी साधकांना सांगायचे आणि त्यांची क्षमा मागायचे. ते गुरुसेवेत झालेल्या चुकांविषयी संवेदनशील होते. त्यांच्या मनात एखाद्या साधकाविषयी आलेले अयोग्य विचार संबंधितांना सांगून ते त्यांची क्षमा मागत असत. आध्यात्मिक त्रासामुळे त्यांची व्यष्टी साधना पूर्ण होत नसे. त्या वेळी ते साधकांना प्रांजळपणे मनाची स्थिती सांगून उपाय विचारून घेत असत.

१ इ. मनापासून आणि झोकून देऊन सेवा करणे 

१. दादांना तीव्र आध्यात्मिक त्रास असतांनाही ते झोकून देऊन सेवा करत असत. त्यांना कितीही अडचणी आल्या, तरीही ते मनापासून सेवा करत.

२. ते जिज्ञासूंना संस्थेचे कार्य आणि साधना सांगून उत्तरदायी साधकांशी त्यांची भेट घडवून आणत असत. ‘अधिकाधिक जिज्ञासू संस्थेशी जोडले जावेत आणि त्यांची साधना व्हावी’, अशी दादांची तळमळ असे.

१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव आणि अढळ श्रद्धा होती. समाजातील काही जण त्यांना ‘तू शिकला आहेस, तर काही तरी काम कर. हे सर्व सोडून दे. हे काम करून तुला काय मिळणार ?’, असे म्हणत असत. त्यांनी लोकांचे बोलणे मनावर न घेता ते सतत २० वर्षे संस्थेच्या माध्यमातून सेवारत राहिले.

‘मोहनदादांमधील गुण आमच्यातही वृद्धींगत होवोत’, अशी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना करतो.’

२. अधिवक्ता अभय अनिल कुलकर्णी, पंढरपूर

२ अ. दादांच्या मृत्यूविषयी मिळालेली पूर्वसूचना : ७.१.२०२२ या दिवशी सकाळी ‘जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे’, असे मला वाटत होते. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता मोहनदादांच्या निधनाचे वृत्त झाल्याचे समजले.

२ आ. मोहनदादांच्या मृत्यूनंतर जाणवलेले सूत्र : दादांचा तोंडवळा प्रसन्न आणि तेजस्वी वाटत होता.’

३. श्री. राजन बुणगे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सोलापूर

३ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती भाव

१. ‘मोहनदादा घरोघरी दैनिक ‘सनातन प्रभात’ देतांना अनवाणी चालत जायचे. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप आहे’, असा भाव ठेवून ते उन्हाळ्यातही पाय कितीही पोळत असले, तरी दैनिकाचे वितरण अनवाणीच करायचे.

२. त्यांना कितीही विलंब झाला, तरी ते सर्व दैनिकांचे वितरण झाल्यावरच दुपारचा महाप्रसाद घेत असत.’

६. अधिवक्ता नीलेश सांगोलकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), पंढरपूर

६ अ. गुरुकार्याची ओढ : ठिकठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभा असतांना ते त्यांच्याकडील सेवा आणि अन्य कामे पूर्ण करून प्रत्येक सभेला येण्याचा आटोकाट प्रयत्न करायचे. ते सभेनंतर आवराआवर करण्याच्या सेवेत मनापासून सहभागी व्हायचे. त्यांची गुरुकार्य करण्याची ओढ स्पष्टपणे जाणवत होती.

६ आ. देवाची आठवण झाल्यावर दर्शन घेण्यासाठी लगेच मंदिराकडे जाणे : दादांचे देवतांप्रती वेगळ्या प्रकारचे आकर्षण आणि भाव अनुभवायला मिळत होता. एखाद्या देवतेचे दर्शन घ्यायचे राहिल्याचे लक्षात येताच ते त्वरित त्या देवतेचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे जायचे. ते मला सांगायचे, ‘‘मला मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतल्याविना करमत नाही.’’ देवाविषयीची ओढ आणि दर्शन घेत असतांनाचा त्यांचा भाव फार निराळा असायचा.

६ इ. ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना करतांना ‘ते अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवायचे.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक ११.४.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक