विजयपूर, बागलकोट येथील श्री. मल्लिकार्जुन दळवाई आणि सौ. गीता शिंदे यांना आलेल्या अनुभूती

१. श्री. मल्लिकार्जुन दळवाई यांना स्वप्नात ‘गुरुदेव दर्शन देणार आहेत’, असे सांगितल्याचे जाणवणे

श्री. मल्लिकार्जुन दळवाई

‘एकदा आम्ही सर्व कुटुंबीय रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेव्हा तेथील साधिकेने आम्हाला सांगितले, ‘‘तुम्हाला संध्याकाळी भावसत्संग आहे.’’ आम्ही सर्वांनी लवकर महाप्रसाद घेतला आणि तिथे गेलो. त्या वेळी ताई म्हणाली, ‘‘हा सत्संग हिंदी भाषेमध्ये आहे. तुमच्यासाठी उद्या सत्संग आहे.’’ तेव्हा माझ्या वडिलांना (श्री. मल्लिकार्जुन दळवाई यांना) फार वाईट वाटले. खोलीत गेल्यावर ‘आज गुरुदेवांचे दर्शन झाले नाही’, असे मोठा भाऊ म्हणाला. १ घंट्यानंतर ताईने येऊन ‘प्रार्थना करा’, असे सांगितले. प्रार्थना करतांना बाबांना झोप लागली आणि स्वप्नात बाबा गुरुदेवांच्या कक्षाला नमस्कार करून ध्यानमंदिराकडे गेले. तेव्हा ध्यानमंदिरात बसल्यावर ‘गुरुदेवा, दर्शन द्या’, असे म्हटल्यावर एका ताईने त्यांना स्वप्नात ‘तुम्हाला ८ वाजता गुरुदेव दर्शन देणार आहेत’, असे सांगितल्याचे जाणवले.

२. कुकरचा स्फोट झाला, तरी गुरुकृपेमुळे आईला काहीच न होणे

घरी असतांना आई स्वयंपाक करत होती. तिने गॅसवर कुकर ठेवला आणि नामजप करत बसली. थोडासा नामजप झाल्यावर तिने वळून पाहिले, तर कुकरचा स्फोट झाला होता; परंतु गुरुकृपेमुळे आईला काहीच झाले नाही.

३. स्वप्नात गुरुदेव बोलत असल्याचे दृश्य दिसणे

सौ. गीता शिवानंद शिंदे

मला ‘गुरुदेव कधी दर्शन देतील ?’, असे वाटत होते. स्वप्नात मला ‘गुरुदेव त्यांच्या कक्षातून बाहेर आले आणि सर्व साधकांशी बोलत आहेत’, असे दृश्य दिसले. त्या वेळी गुरुदेवांनी माझ्याशी बोलावे; म्हणून मी त्यांना ‘गुरुदेव’, असे म्हटले. तेव्हा त्यांनी विचारले, ‘‘तू कोण ?’’ आणि नंतर त्यांनी मला ओळखले. या स्वप्नामुळे माझी भावजागृती झाली.

४. कृतज्ञता व्यक्त करतांना गुरुदेव डोक्यावर हात ठेवून गेल्याचे जाणवणे

एकदा वाचक संमेलन संपल्यावर गटचर्चा होती. गटचर्चेनंतर माझी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त होत होती आणि तिथल्या ग्रामदेवतेची पूजा चालू असतांनाही भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतांना ‘माझ्या डोक्यावर गुरुदेव हात ठेवून गेले’, असे जाणवले.’

– सौ. गीता शिवानंद शिंदे  (पूर्वाश्रमीच्या कु. गीता दळवाई), विजयपूर, बागलकोट, कर्नाटक.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक