सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येऊन गेल्यानंतर अधिवक्ता चारुदत्त जोशी यांना सुचलेली कविता
व्यष्टी साधनेने
उगवतो दिवस सुंदर ।
समष्टी साधनेचे प्रयत्न,
हाच दुपारचा ध्यास ।। १ ।।
संध्याकाळ भासते
शरणागत अन् कृतज्ञ ।
आत्मनिवेदनात सरते
अवघी रात्र ।। २ ।।
सकाळ अन् संध्याकाळचे सत्संग ।
घडवतात भावजागृतीचे अनेक प्रसंग ।। ३ ।।
लावतात मनाला साधनेची गोडी ।
देतात प्रचीती अनुसंधानाची ।। ४ ।।
आता माझ्या सर्वस्वावर ।
आहे गुरुमाऊलीचा अधिकार ।। ५ ।।
साधक-फूल बनवून आम्हाला ।
गुरुमाऊली, द्यावा कृपाशीर्वाद आपला ।। ६ ।।
– अधिवक्ता चारुदत्त जोशी, संभाजीनगर, महाराष्ट्र. (१७.६.२०२०) (मृत्यूपूर्वी केलेली कविता, मृत्यूदिनांक २८.४.२०२१), (मृत्यूसमयी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |