उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. हरिअंश निखार हा या पिढीतील एक आहे !
मार्गशीर्ष कृष्ण तृतीया (३०.१२.२०२३) या दिवशी चि. हरिअंश मिलिंद निखार याचा द्वितीय वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि आजी यांच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. हरिअंश मिलिंद निखार याला द्वितीय वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. जन्मानंतर – सात मास ते १ वर्ष
अ. ‘चि. हरिअंशला पाळण्यात झोपवल्यावर तो भिंतीवर लावलेल्या सनातन-निर्मित हनुमानाच्या चित्राकडे एकसारखा बघून हसत असे. त्याला झोप येईपर्यंत तो सनातन पंचांगमधील गणपतीच्या चित्राकडे एकसारखा बघत असे. त्याला ‘सनातन पंचांगात असलेल्या सर्व देवतांची माहिती आहे’, असे मला वाटले.
आ. त्याची आई महाविद्यालयात शिकवण्यासाठी गेल्यानंतर तो पुष्कळ रडत असे. तेव्हा मी ‘देवाला बोलावणे, कृष्णा ये, गुरुमाऊली या, निद्रादेवी या, असा भावप्रयोग करत असे, तसेच सनातन चैतन्यवाणीवरील नामजप आणि श्लोक लावत असे. त्यानंतर तो शांत झोपत असे.
इ. तो ९ मासांचा असतांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी त्याच्या शरिरावर पुष्कळ दैवी कण आढळले.
ई. त्याला माझ्या मांडीवर बसून देवाची पूजा होईपर्यंत थांबायला आवडते. आम्ही आरती करतांना त्याला पुष्कळ आनंद होत असे. तो हसत टाळ्या वाजवत असे.
२. वय १ ते २ वर्षे
अ. ‘आम्ही सकाळी उठल्यावर ‘कराग्रे वसते लक्ष्मी…’ हा श्लोक म्हटल्यावर तो हाताची ओंजळ करतो आणि चेहर्यावरून हात फिरवतो.
आ. त्याला देवळात जायला, तिथे थांबायला आणि घंटा वाजवायला पुष्कळ आवडते. त्याला देवाला कुंकू आणि फुले वहायला आवडतात.
इ. एकदा मी त्याला विचारले, ‘‘गुरुमाऊली कुठे आहे ?’’ तेव्हा त्याने परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची एकत्रित छायाचित्रे असलेल्या छायाचित्राकडे बोट दाखवले.
ई. त्याला टिळा लावायला आवडते.’
– श्रीमती सरिता रा. निखार (चि. हरिअंशची आजी, वय ६४ वर्षे), वर्धा
उ. ‘हरिअंशला मोठ्या व्यक्तींशी हात जोडून ‘राम राम’ करायला आवडते.
ऊ. त्याने एखादी वस्तू घेतल्यास ज्या ठिकाणाहून त्याने वस्तू घेतली असेल, त्या ठिकाणीच तो नंतर वस्तू व्यवस्थित ठेवतो.’
– सौ. चैताली मिलिंद निखार (चि. हरिअंशची आई), वर्धा
ए. ‘हरिअंशला सनातन पंचांगातील प्रत्येक मासाच्या पानावरील देवतांच्या चित्राला नमस्कार करायला आवडते. तो साष्टांग नमस्कार घालतो किंवा डोके टेकवून नमस्कार करतो.
ऐ. आम्ही मंदिरात गेल्यावर तो मंदिराच्या पहिल्या पायरीला नमस्कार करून आत जातो.’
– श्री. मिलिंद रामकृष्णराव निखार (चि. हरिअंशचे वडील), वर्धा
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १८.११.२०२३)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |