ऑगस्टमध्ये २ दिवस माझे डोळे खाज येऊन चुरचुरत होते आणि डोळ्यांची आग होत होती. ते लाल होऊन त्यांतून पाणी येत होते. दोन दिवसानंतर मला त्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करायचा आहे, हे कळले. मी त्वरित हा नामजप चालू केला. मी २ दिवस प्रतिदिन एक घंटा जप केल्यानंतर माझ्या डोळ्यांचा लालसरपणा नाहीसा झाला. माझ्या डोळ्यांतून पाणी येणे थांबले आणि डोळ्यांची खाजही ५० टक्क्यांनी न्यून झाली. गुरुमाऊलींनी मला त्यांची कृपा अनुभवण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांच्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सुरेखा अंकुश काटे, सांगवी, पुणे. (ऑगस्ट २०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |