सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांच्यात बालवयातच असलेली चुकांविषयीची संवेदनशीलता आणि शिकण्याची वृत्ती !

या संवादातून पू. भार्गवराम यांची शिकण्याची वृत्ती माझ्या लक्षात आली. ‘गुरुदेवा, केवळ आपल्याच कृपेने पू. भार्गवराम विचारत असलेल्या प्रश्नांना मला उत्तरे देता आली’, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

घटस्थापनेच्या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या‘देवी यागा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘आश्विन शुक्ल प्रतिपदा (घटस्थापना) २६.९.२०२२ या दिवशी ‘देवी होम’ याग चालू असतांना आरंभी माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार चालू होते. थोड्याच वेळात मला ‘देवी तिच्या चैतन्याने माझ्यातील नकारात्मकता नष्ट करत आहे’, असे जाणवले.

आज गोंधळ घालूया आई भवानीचा । गोंधळ घालूया या आदिशक्तीचा ।

कलियुगी अवतार प्रकटला आई भवानीचा । घटस्थापनेच्या आधी जन्म झाला आदिशक्तीचा (टीप १)।। चहूबाजूंनी जागर झाला नवरात्रीचा ।
विचार करण्या समष्टी कल्याणाचा ।। या मातेने आधार घेतला श्रीविष्णुवैकुंठाचा । रं…जी…जी…जिजी…जी..।। १ ।।

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात केलेल्या चंडीयागाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात केलेल्या चंडीयागाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

भक्ताच्या हाकेला तत्क्षणी धावून येऊन त्याच्या संकटाचे निवारण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

गुरुदेवा, तुम्हाला प्रार्थना केल्यावर २ मिनिटांतच ती माशी एकदम नाहीशी झाली आणि तुमच्या कृपेने पुढील अर्धा घंटा माझा नामजप एकाग्रतेने झाला.

नवरात्रीच्या काळात रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यागांचे प्रक्षेपण देवद (पनवेल) येथील आश्रमात पहातांना साधिकेला आलेल्या अनुभूती

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ३, ४ आणि ५ ऑक्टोबर २०२२ या दिवशी याग करण्यात आले. सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात साधकांना या यागांचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्षेपण दाखवण्यात आले. हे प्रक्षेपण पहातांना मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे चैतन्य मिळावे, यासाठी त्यांनी दिलेल्या साडीच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती !

एक-दीड मासानंतर माझ्या त्रासाची तीव्रता उणावली. तेव्हा मी ती साडी अंगावर पांघरण्याऐवजी डोक्याजवळ ठेवून झोपत असे. त्यामुळे मला शांत झोप लागायची.

जळगाव येथे लावले इस्रायलविरोधी फलक ! 

येथे काही फलकांवर ‘इस्राईल बॉयकॉट’ (इस्रायलवर बहिष्कार) लिहिलेले फलक लावण्यात आले हाेते. पोलिसांनी ते काढून ठेवले. हा प्रकार करणार्‍यांचा पोलीस शोध घेत आहेत.

मुंबईत २ पॅलेस्टाईन समर्थकांना अटक !

इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धाच्या विरोधात आंदोलन करणार्‍या २ पॅलेस्टाईन समर्थकांना मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. रुचिर लाड आणि सुप्रीत रविश अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर विनाअनुमती आंदोलन करणे, सरकारी आदेशाची अवज्ञा करणे असे आरोप आहेत.

ऐन नवरात्रोत्सवात सांडपाणी आणि अन्य दूषित पाणी पंचगंगेत 

कोल्हापूर शहरासाठी ज्यातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो, त्या पंचगंगेत ऐन नवरात्रोत्सवात शहरातील विविध नाल्यांमधील पाणी थेट नदीत मिसळत आहे. या संदर्भात ‘प्रजासत्ताक’ या सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई आणि त्यांचे सहकारी यांनी पहाणी करून हा प्रकार उघडकीस आणला.