१. ‘देवी तिच्या चैतन्याने नकारात्मकता नष्ट करत आहे’, असे साधिकेला जाणवणे
‘आश्विन शुक्ल प्रतिपदा (घटस्थापना) २६.९.२०२२ या दिवशी ‘देवी होम’ याग चालू असतांना आरंभी माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार चालू होते. नंतर पुरोहितांनी ‘सर्वांनी बीजमंत्राचे उच्चारण करूया’, असे सांगितल्यावर मी बीजमंत्रांचा उच्चार करू लागले. थोड्याच वेळात मला ‘देवी तिच्या चैतन्याने माझ्यातील नकारात्मकता नष्ट करत आहे’, असे जाणवले.
२. यागामुळे वातावरणात चैतन्य पसरल्याने मनाला पुष्कळ हलके वाटून उत्साह मिळणे
मला यागाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पहातच रहावे’, असे वाटत होते. यागाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणातील चैतन्याने मला पुष्कळ हलके वाटले. मागील दीड मास मला शारीरिक त्रास होत होता. तो एकदम बरा झाल्याचे जाणवून उत्साह वाटू लागला.
३. ‘देवीचा आशीर्वाद सर्वांना मिळत आहे’, असे दृश्य दिसून पुष्कळ भावजागृती होणे
जेव्हा सौ. भक्ती कुलकर्णी देवीचे स्तुतीगीत गात होत्या, तेव्हा ‘प्रत्यक्ष श्री सरस्वतीदेवी तिथे उपस्थित राहून ते गीत ताईच्या मुखातून वदवून घेत आहे आणि देवीचा आशीर्वाद आम्हा सर्वांना मिळत आहे’, असे दृश्य मला दिसत होते. या दृश्याने माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘देवी आमचे रक्षण करत आहे’, या भावाने मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
४. कृतज्ञता
देवाने त्याच्या वैकुंठातील यागामध्ये या जिवाला सहभागी करून घेतले आणि भरभरून चैतन्य दिले, याबद्दल गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. आशा होनमोरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |