आज गोंधळ घालूया आई भवानीचा । गोंधळ घालूया या आदिशक्तीचा ।

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

कलियुगी अवतार
प्रकटला आई भवानीचा ।
घटस्थापनेच्या आधी जन्म झाला आदिशक्तीचा (टीप १)।।
चहूबाजूंनी जागर झाला नवरात्रीचा ।
विचार करण्या समष्टी कल्याणाचा ।।
या मातेने आधार घेतला श्रीविष्णुवैकुंठाचा ।
रं…जी…जी…जिजी…जी..।। १ ।।

श्री. संकेत भोवर

लाल कुंकवाचा भाळी भरला मळवट ।
सेवेसाठी तिच्या आले दुरूनी साधकजन ।।
आईचा गोंधळ घालतो भावभक्तीचा संबळ वाजवून ।
मातेच्या जन्मदिनी हर्षीत होती देवदेवता अन् ऋषिगण ।।
रं….जी…जी….जीजी…जी.. ।। २ ।।

ध्यानी-मनी सतत श्रीविष्णूचे स्मरण ।
साधकांवरील संकटांना दूर करी श्रीविष्णूवरील श्रद्धेनं ।।
अचूक असे साधकांचे निरीक्षण अन् करी योग्य दिशादर्शन ।
आईसम प्रेम देऊनी साधकांत वाढवी श्रद्धेची खाण ।।
रं….जी…जी…. जीजी…जी.. ।। ३ ।।

श्रीविष्णूची (टीप २) आध्यात्मिक उत्तराधिकारी
म्हणून झाली गुरुपदावर आरूढ ।
श्रीविष्णूची श्रीसत्‌शक्ति म्हणून ओळख लाभली या वैकुंठात ।।
साधकांचे त्रास झेलण्या सदा माता असे तत्पर ।
विश्वाच्या कल्याणासाठी सहभाग घेई यज्ञ-यागांत ।।
रं….जी….जी…..जीजी….जी.. ।। ४ ।।

या मातेमुळे रामनाथीचे आता वैकुंठ जाहले ।
अनेक साधक साधनेत पुढे जाऊ लागले ।।
मातेच्या कृपेने सेवेतला उत्साह वाढे दिवसभर ।
आध्यात्मिक त्रासांशी लढण्या माता कृपा करी साधकांवर ।।
रं…जी…जी…..जीजी….जी.. ।। ५ ।।

सप्ताहात एकदा मातेची वाणी करत असे श्रीविष्णूचे वर्णन ।
वाणीने प्रसन्न होती देवीदेवता अन् करती फुलांची उधळण ।।
साधक होती भावविभोर मन जाते बहरून ।
प्रत्येक साधकास हे वैकुंठ शोभे देवलोकासमान ।।
रं…जी…जी….जीजी…..जी… ।। ६ ।।

अशा श्रीसत्‌शक्तीची महती वर्णिली महर्षींनी ।
चला साधकांनो मातेची भक्ती करूया श्रद्धेनी ।।
संकटांना सामोरे जाण्यास जगदंबेला सतत घालूया साद ।
आपले स्वभावदोष अन् अहं घालवण्या घेऊ मातेचे आशीर्वाद ।।
रं…जी…जी…..जीजी…..जी… ।। ७ ।।

श्रीविष्णूचा संकल्प असे राष्ट्राला हिंदु राष्ट्र करण्याचा ।
हाती घेई ध्वज माता वारू उधळला चौफेर रामराज्याचा ।।
भक्ती वाढवू सारे जण हा सोहळा मातेप्रती कृतज्ञतेचा ।
आईच्या नावाचा भंडारा उधळूया आज गोंधळ घालूया ।।
या आई भवानीचा, गोंधळ घालूया या आदिशक्तीचा ।
रं…जी…जी….जीजी……जी…. ।। ८ ।।

टीप १ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

टीप २ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

– श्री. संकेत भोवर, रामनाथी, गोवा. (२३.९.२०२२)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक