सिंधुदुर्ग : झाराप येथील शाळेत शिक्षक मिळावा, यासाठी पालक आजपासून पुन्हा आंदोलन करणार !
शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांना सातत्याने आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांना सातत्याने आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
गोव्यात अमली पदार्थ व्यवसायाप्रकरणी बहुतांश नायजेरिन नागरिकांना पकडण्यात येते. राज्यातील नायजेरियन नागरिकांच्या कृतींवर पोलिसांनी करडी दृष्टी ठेवणे आवश्यक असल्याचे दिसून येते !
वेतनाअभावी कंत्राटी शिक्षकांनी दिलेल्या सामूहिक राजीनाम्याचा परिणाम !
आरोपी खुशाल भुंडे हा चांदणी चौकाजवळील ‘वेधभवना’जवळ मित्राची वाट बघत थांबलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा तिथे अमित दगडे आणि मनीष मोरे हे आले असता पोलिसांनी त्या तिघांना अटक केली.
महिला प्रवाशाचा पाठलाग करत तिचे छायाचित्र काढून छेड काढणार्या विकृत तरुणाला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली.
येथील १३ वर्षीय मुलीने रेल्वे रुळांवर उडी मारून आत्महत्या केली. शिकवणीवर्गाला जाण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडून ती मुलुंड रेल्वेस्थानकात पोचली.
राजगडावर गेलेल्या १६ पर्यटकांच्या गटावर सकाळी मधमाशांनी आक्रमण केले. यात ४ पर्यटक गंभीर घायाळ झाले असून त्यांना चिकित्सालयात नेण्यात आले आहे.
धर्मादाय रुग्णालयांमधून सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे मिळत नसल्याच्या तक्रारी नेहमीच शासनाकडे येत असतात.
शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्या आणि प्रसंगी अपघातास कारणीभूत ठरणार्या मोकाट जनावरांच्या १० मालकांविरुद्ध चंद्रपूर महानगरपालिकेने तक्रार प्रविष्ट करून गुन्हे नोंदवले आहेत.
मिळकतकर भरण्यास मिळकतधारकांना प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेने १ कोटी रुपयांची विविध पारितोषिके देण्याचे घोषित केले होते.