महिलेची छेड काढणारा कह्यात !

कल्‍याण – येथे महिला प्रवाशाचा पाठलाग करत तिचे छायाचित्र काढून छेड काढणार्‍या विकृत तरुणाला डोंबिवली रेल्‍वे पोलिसांनी अटक केली. संजय बोरा असे त्‍याचे नाव आहे. तो गेल्‍या १ मासापासून पीडित महिलेचा पाठलाग करत होता.