मोकाट जनावरांच्‍या १० मालकांविरुद्ध गुन्‍हा नोंद !

चंद्रपूर – शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या आणि प्रसंगी अपघातास कारणीभूत ठरणार्‍या मोकाट जनावरांच्‍या १० मालकांविरुद्ध चंद्रपूर महानगरपालिकेने तक्रार प्रविष्‍ट करून गुन्‍हे नोंदवले आहेत. संबंधित मालक त्‍यांची जनावरे मोकाट सोडून देतात.