पुणे – हत्येच्या गुन्ह्यामध्ये खुशाल भुंडे जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तो ११ वर्षांपूर्वी ‘पॅरोल’ (कैद्याची विशिष्ट मुदतीपुरती केलेली सशर्त मुक्तता) घेऊन बाहेर येऊन पसार झाला होता. त्याला आणि त्याच्या २ साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ पिस्तुले आणि ४ काडतुसे असा १ लाख २० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी खुशाल भुंडे हा चांदणी चौकाजवळील ‘वेधभवना’जवळ मित्राची वाट बघत थांबलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा तिथे अमित दगडे आणि मनीष मोरे हे आले असता पोलिसांनी त्या तिघांना अटक केली.