धाराशिव द्वितीय, तर हिंगोली तिसर्या स्थानावर !
हिंगोली – मराठवाड्यात महाआवास अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेमध्ये छत्रपती संभाजीनगर प्रथम, धाराशिव द्वितीय, तर हिंगोली जिल्हा परिषदेने तृतीय पुरस्कार मिळवला आहे. १६ मे या दिवशी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजनेची गतीमान कार्यवाही करण्यासाठी, तसेच गुणवत्तापूर्ण कामांसाठी २० नोव्हेंबर २०२१ ते ५ जून २०२२ या कालावधीत महाआवास अभियान राबवण्यात आले आहे. या अभियानांतर्गत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांनी राबवलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करण्यात आले होते. त्यानुसार उत्कृष्ट काम करणार्या यंत्रणांना ‘महाआवास अभियान ग्रामीण’ हा पुरस्कार दिला जाणार आहे.
याशिवाय राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये सर्वाेत्कृष्ट जिल्हा परिषद प्रथम छत्रपती संभाजीनगर, द्वितीय धाराशिव, तृतीय परभणी. सर्वोत्कृष्ट पंचायत समितीमध्ये प्रथम पंचायत समिती कळंब, द्वितीय पंचायत समिती वैजापूर, तृतीय पंचायत समिती पैठण. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम ग्रामपंचायत खलंग्री (तालुका रेणापूर), द्वितीय ग्रामपंचायत दाभरूळ (तालुका पैठण) आणि तृतीय ग्रामपंचायत जळकी (ता. सिल्लोड) यांचा समावेश आहे.