दैनिक ‘सामना’च्या मुख्य संपादकपदी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे !

मुंबई – शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या मुख्य संपादकपदाचे दायित्व पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आले आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे दायित्वकडे स्वतःकडे घेतले आहे, तर कार्यकारी संपादकपदी संजय राऊत यांचे नाव अद्याप कायम ठेवले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी मार्च २०२० मध्ये संपादकपद पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवले होते.