मुंबईतील वाडिया रुग्णालयाला भीषण आग !

मुंबई – मुंबईतील नामांकित वाडिया रुग्णालयाला ५ ऑगस्टच्या सायंकाळी भीषण आग लागली. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर शस्त्रक्रिया विभागाच्या ठिकाणी आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीनंतर अग्नीशमनदलाचे जवान घटनास्थळी आले असून सायंकाळी ७.१५ वाजता आग विझवण्याचे प्रयत्न चालू होते. या कालावधीपर्यंत आगीमध्ये कोणती हानी झाली, ही माहिती कळू शकली नाही. आग कोणत्या कारणास्तव लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.