‘मुंबई बँके’च्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड !

प्रवीण दरेकर (उजवीकडे)

मुंबई – भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची ‘मुंबई बँके’च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मविआच्या काळात बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची, तर उपाध्यक्षपदी विठ्ठल भोसले यांची निवड करण्यात आली होती. सत्तापालटानंतर दोघांनीही अचानक राजीनामे दिले होते. दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून खोट्या कागदपत्रांआधारे निवडणूक लढवली असल्याचा ठपका सहकार विभागाने ठेवला होता. त्यामुळे त्यांना तत्कालीन अध्यक्षपदाची निवडणूक लढवता आली नव्हती.