राज्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत पुणे जिल्हा अग्रस्थानी !

डेंग्यूच्या रुग्णसंख्येत राज्यात पुणे जिल्हा अग्रस्थानी आहे. जूनअखेर राज्यात डेंग्यूचे १ सहस्र १४६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३०५ रुग्ण पुण्यातील आहेत. ही संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे १६ जणांचे बळी

नागपूर जिल्ह्यात सावनेर तालुक्यात पुलावरून पाणी वहात असतांनाही चालकाने गाडी पुलावर घातल्याने मध्यप्रदेशातील एकाच कुटुंबातील ६ जण वाहून गेले. नाशिक जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये एका ६ वर्षांच्या चिमुकलीसह ५ जण, तर नंदुरबार जिल्ह्यात २ महिला वाहून गेल्या आहेत.

नाशिक येथील सप्तशृंगीदेवी मंदिर २१ जुलैपासून दर्शनासाठी ४५ दिवस बंद !

११ जुलै या दिवशी मुसळधार पावसात संरक्षक भिंत कोसळून पायर्‍यांवर पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने त्यात ५ भाविक घायाळ झाले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी विश्वस्तांनी ही माहिती दिली.

गोपाळकाल्यासाठी गोपाळपूरनगरी वारकर्‍यांच्या गजराने दुमदुमून गेली !

आषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर पौर्णिमेला गोपाळपूर येथे गोपाळकाला होतो. मागील ५ ते ६ दिवसांपासून पंढरपूरमध्ये आलेले भाविक गोपाळकाल्यासाठी उपस्थित होते.

कधीच अंगार विझणार नाही, हिंदुत्वाविना विचार नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाविना विचार नाही’, गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील शब्दांत त्यांचे राजकीय गुरु बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत हिंदुत्वाचा अंगीकार केल्याचा पुनरुच्चार केला.

वर्धा जिल्ह्यात रात्रभर पावसाचे थैमान

वर्धा तालुक्यातील पवनूर येथे सतत चालू असलेल्या पावसामुळे वन विभागाचा वनराई बंधारा फुटला. त्यामुळे नाल्याला पूर आल्याने पवनूर, खानापूर आणि कामठी या गावांत पाणी शिरले.

जाचक अटी रहित करून शेतकर्‍यांना ५० सहस्र रुपयांचे अनुदान द्या ! – आमदार आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

राज्यात प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० सहस्र रुपयांच्या अनुदानासाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी रहीत करून शेतकर्‍यांना थेट ५० सहस्र रुपये अनुदान देण्यात यावे, यांसाठी शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, तसेच शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना निवेदन दिले.

नाशिक-गुजरात सीमेवरील दमणगंगा नदीला पूर !

मागील काही दिवसांपासून मुसळधार बरसणार्‍या पावसामुळे नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. गंगापूर, कश्यपी धरणातील पाणीसाठा वाढला आहे, तर त्र्यंबकेश्वर, हरसूल, सुरगाणा आदी भागांत रस्ते खचले असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत.

पहिले पाढे पंचावन्न !

‘आगामी काळात त्यांचे तांडव पहायला मिळू शकते’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. त्याचे रौद्ररूप पहाण्याची वेळ ओढवून घेण्यापेक्षा वेळीच जागे होण्यातच शहाणपण आहे. निसर्गरक्षणाचा संकल्प करून कृती केली, तर निसर्गदेवही आशीर्वाद दिल्याविना रहाणार नाही !