वर्धा जिल्ह्यात रात्रभर पावसाचे थैमान

२ जण वाहून गेले

पवनूर येथे गावांत पाणी शिरले

वर्धा – वर्धा तालुक्यातील पवनूर येथे सतत चालू असलेल्या पावसामुळे वन विभागाचा वनराई बंधारा फुटला. त्यामुळे नाल्याला पूर आल्याने पवनूर, खानापूर आणि कामठी या गावांत पाणी शिरले. नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. पवनूर येथील नागरिकांची स्थानिक मंदिरात व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. सेलू तालुक्यातील पुराच्या प्रवाहात संतोष आडे हा युवक वाहून गेला, तर पवनूर येथील पुरात शालिक पाटील हा गुराखी वाहून गेला.