नाशिक – सप्तशृंग गडावरील भगवतीच्या मूर्तीचे संवर्धन करणे, तसेच विविध कामे यांसाठी २१ जुलैपासून मंदिर पुढील ४५ दिवस बंद रहाणार आहे, अशी माहिती सप्तशृंगी निवासिनी विश्वस्तांनी दिली आहे. ११ जुलै या दिवशी मुसळधार पावसात संरक्षक भिंत कोसळून पायर्यांवर पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने त्यात ५ भाविक घायाळ झाले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी विश्वस्तांनी ही माहिती दिली.