पुणे- डेंग्यूच्या रुग्णसंख्येत राज्यात पुणे जिल्हा अग्रस्थानी आहे. जूनअखेर राज्यात डेंग्यूचे १ सहस्र १४६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३०५ रुग्ण पुण्यातील आहेत. ही संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. शहरातील लोकसंख्या आणि पडताळणीचे प्रमाण अधिक असल्याने ही रुग्ण संख्या अधिक असावी, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. पुण्याच्या खालोखाल कोल्हापूर ११३, सातारा २४, सांगली २२, ठाणे, सोलापूर आणि अकोला प्रत्येकी १२, पालघर १० आणि त्यानंतर इतर सर्व जिल्ह्यांत रुग्णसंख्या १० पेक्षा अल्प आहे.