काही बेशिस्त भाविकांनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात टाकल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या !

मंदिराच्या  परिसरात सात्त्विकता टिकवणे हे भाविकांचेही कर्तव्य आहे, हे समजण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे यातून अधोरेखित
होते ! मंडपाच्या छतावर बाटल्या नेऊन कुणी टाकल्या याचा शोध घेऊन त्यांना शासन करायला हवे !

मुंबईत पॉक्सोसह विनयभंग हे गुन्हे पोलीस उपायुक्तांच्या अनुमतीने नोंद होणार ! – पोलीस आयुक्त

मुंबई परिसरातील पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’ (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा) किंवा विनयभंग या संदर्भातील गुन्हे नोंद करण्यापूर्वी पोलीस उपायुक्तांची अनुमती घ्यावी लागणार आहे. याविषयीचा आदेश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिला आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांकडून भाजप कार्यालयासमोर आंदोलन; कार्यकर्त्यांची धरपकड !

भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री सौ. पंकजा मुंडे यांना प्रथम राज्यसभा आणि आता विधान परिषदेसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांच्या ४ समर्थकांनी उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयासमोर ९ जून या दिवशी घोषणा देत आंदोलन केले.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा मतदानासाठीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !

राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी एक दिवसाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाकडे केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करा ! – शंभूराज देसाई

राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्तपणे आणि अविचाराने वाहन चालवणारे, तसेच विनाहेल्मेट, चुकीच्या दिशेने वाहन चालवणारे दुचाकी वाहनचालक या सर्वांवर धडक कारवाई करण्याच्या सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत, अशी माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.

पुढील वर्षापासून ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ प्रत्येक महाविद्यालय आणि विद्यापीठ येथे उभारली जाईल ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री

पुढील वर्षापासून ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापिठात उभारली जाईल आणि प्रतिवर्षी एका गडावर विद्यार्थ्यांसह हा सोहळा शासनाच्या वतीने साजरा केला जाईल. यासाठी लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली.

वांद्रे येथे इमारत कोसळून एकाचा मृत्यू !

वांद्रे येथील शास्त्रीनगर परिसरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव पथक, अग्नीशमन दलाच्या गाड्या, तसेच पोलीस घटनास्थळी आले.

अंबरनाथ येथे आगीत २ गोदामे भस्मसात !

या गोदामांमध्ये स्वच्छताद्रव्य आणि तेलाच्या प्रकारातील रंग असल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरली. गोदामांतील पिंपांचे मोठमोठे स्फोट झाले.

‘राजा शिवछत्रपती’ परिवारातील १०० जणांनी केली परंडा येथील भुईकोट गडाची स्वच्छता !

पर्यावरणदिनाच्या निमित्ताने येथील ऐतिहासिक भुईकोट गडाच्या ठिकाणी ‘राजा शिवछत्रपती’ परिवारातील एकूण १०० जणांनी ५ जून या दिवशी स्वच्छता अभियान राबवून गड संवर्धनाचा संदेश दिला.

नुपूर शर्मा यांच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

शर्मा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ अंबरनाथ शहरातील ‘मुस्लिम कमिटी’कडून अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला.