
मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी एक दिवसाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाकडे केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी हे मतदान केले नाही, तर ते त्यांच्या कर्तव्यापासून वंचित रहातील. त्यातून जनतेच्या मताचाही अनादर होईल, असा युक्तीवाद देशमुख आणि मलिक यांच्या अधिवक्त्यांनी केला.
या वेळी अंमलबजावणी संचालनालयाचे अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंह यांनी लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत बंदीवानांना मतदानाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !