युक्रेनने काळ्या समुद्रात गस्ती घालणाऱ्या रशियाच्या २ युद्धनौका बुडवल्या !

युक्रेनने ड्रोनचा (मानविरहित यंत्राचा) वापर करून दोन गस्ती नौकांवर आक्रमण केले. यात दोन्ही युद्धनौका नष्ट झाल्या. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे.

भोंग्यामुळे लोकांना त्रास होतो ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

संजय राऊत पुढे म्हणाले की, भोंग्यांपेक्षा महत्त्वाचे विषय आहेत. या भोंग्यांमागे कोणाची वीज आहे, हे देशाला माहिती आहे. हे हिंदुत्व नाही. हे लेचापेचांचे राज्य नाही. भोंग्यांविषयी काय करायचे, हे सरकारला माहिती आहे.

नवाब मलिक यांच्या प्रकृतीचा अहवाल ५ मेपर्यंत सादर करण्याचा न्यायालयाचा निर्देश !

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यास अनुमती मिळावी, अशी विनंती त्यांच्या अधिवक्त्यांनी २ मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे.

राज ठाकरे यांच्या सभेविषयी सर्व गोष्टींचा अभ्यास करून निर्णय घेऊ ! – निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे या दिवशी येथे जाहीर सभा मोठ्या उत्साही वातावरणात आणि शांततेत पार पडली. या सभेसाठी येथील पोलिसांनी १६ अटीं घालून दिल्या होत्या.

राणा दांपत्याच्या जामीन अर्जावर ४ मे या दिवशी सुनावणी !

राजद्रोहाच्या आरोपाखाली कारागृहात असलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्या जामिनाच्या अर्जावर २ मे या दिवशी सुनावणी होऊ शकली नाही.

लोकलच्या प्रथम श्रेणीच्या तिकिटाच्या दरात ५० टक्के कपात

लोकलगाड्यांच्या प्रथम श्रेणीच्या तिकिटाच्या दरात ५० टक्के कपात करण्यात आली आहे.

जेजुरी येथील श्री मार्तंड मंदिराकडून ‘इफ्तार पार्टी’ !

भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेले पैसे अन्य धर्मियांच्या कार्यक्रमांवर उधळण्याचा अधिकार देवस्थानला कुणी दिला ?

सर्वोच्च न्यायालयापेक्षा वेगळा आदेश देण्याचा राज ठाकरे यांना अधिकार नाही ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘‘देशात जाणूनबुजून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. राज ठाकरे यांच्या भाषणात केवळ भोंगे, शरद पवार यांवर टीका आणि त्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारे प्रक्षोभक वक्तव्य  पहायला मिळाले.

नाशिकमधील सप्तशृंग गडावर बिअरचे दुकान थाटण्याचा प्रशासनाचा डाव रणरागिणींनी उधळला !

बिअरच्या दुकानासह मद्य आणि गांजा यांच्या विक्रीवरील बंदीचाही ठराव संमत !

शिवसेनेच्या भगव्याची साथ कदापि सोडणार नाही ! – रामदास कदम, शिवसेना

मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही. अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. मी स्वत:ला डाग कधीच लावून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेचा भगवा झेंडा मरेपर्यंत माझ्या खांद्यावर असेल.