Khamenei  Muslims Should Unite : जगातील मुसलमानांनी त्‍यांच्‍या शत्रूविरुद्ध एकजूट व्‍हावे !

इराणचे सर्वोच्‍च नेते अली खामेनी यांचे आवाहन

अली खामेनी यांचे मुसलमानांना आवाहन

तेहरान (इराण) – इस्रायलने ठार केलेल्‍या हिजबुल्लाचा प्रमुख नसरूल्ला याच्‍या स्‍मरणार्थ येथील ग्रँड मशिदीमध्‍ये प्रार्थनासभा आयोजित करण्‍यात आली होती. या वेळी इराणचे सर्वोच्‍च नेते अली खामेनी यांनी उपस्‍थित सहस्रो लोकांसमोर भाषण केले. त्‍यांनी जगातील मुसलमानांना त्‍यांच्‍या शत्रूविरुद्ध एकजूट होण्‍याचे आवाहन केले. या भाषणाच्‍या वेळी खामेनी यांच्‍या शेजारी रायफल ठेवण्‍यात आली होती. नसरूल्लाच्‍या मृत्‍यूनंतर खामेनी यांना गुप्‍त ठिकाणी नेण्‍यात आले होते. त्‍यानंतर ते पहिल्‍यांदाच सार्वजनिकरित्‍या दिसले. खामेनी याने यापूर्वी वर्ष २०१९ मध्‍ये इराणच्‍या रिव्‍होल्‍युशनरी गार्ड्‍सचा कमांडर कासिम सुलेमानी याच्‍या मृत्‍यूनंतर शुक्रवारच्‍या प्रार्थनेचे नेतृत्‍व केले होते.

सौजन्य:AAj Tak

खामेनी म्‍हणाले की, आमचा शत्रू एकच आहे. मुसलमानांमध्‍ये तेढ निर्माण केली जात आहे. तो (इस्रायल) पॅलेस्‍टाईन, लेबनॉन, इजिप्‍त, सीरिया, येमेन आणि इराक यांचा शत्रू आहे. त्‍यामुळे आमचा शत्रू एक आहे. अली खामेनी यांच्‍या भाषणानंतर लगेचच लेबनॉनमधून इस्रायलवर रॉकेट डागण्‍यात आले.

नसरूल्लाच्‍या मृतदेहाला गुप्‍त ठिकाणी तात्‍पुरते पुरण्‍यात आले

नसरूल्ला

नसरूल्ला याच्‍या मृतदेहाला एका गुप्‍त ठिकाणी तात्‍पुरते पुरण्‍यात आले आहे. जर नसरूल्ला याच्‍या मृतदेहाची मिरवणूक (जनाजा) काढली असती, तर प्रचंड जनसमुदाय जमा झाला असता आणि त्‍यावर इस्रायलने आक्रमण केले असते, अशी भीती हिजबुल्लाला वाटत होती. त्‍यामुळे तात्‍परत्‍या स्‍वरूपात मृतदेह पुरण्‍यात आला आहे. जेव्‍हा परिस्‍थिती सुधारेल तेव्‍हा नसराल्ला याला योग्‍य निरोप दिला जाईल, असे सांगण्‍यात आले आहे.

हिजबुल्लाहने २४ घंट्यांत इस्रायलवर २३० क्षेपणास्‍त्रे  डागली !

इस्रायलच्‍या सैन्‍याने सांगितले की हिजबुल्लाने गेल्‍या २४ घंट्यांत इस्रायलवर सुमारे २३० क्षेपणास्‍त्रे डागली. यामध्‍ये इस्रायलची कोणतीही हानी झाली नाही.

संपादकीय भूमिका

जगभरातील मुसलमान ‘इस्‍लाम खतरे में’ असे म्‍हटल्‍यावर संघटित होऊन प्रतिकार करतात. हिंदू यातून बोध घेतील का ?