Zakir Naik Girls News : पाकमध्‍ये गेलेल्‍या झाकीर नाईक याने एका कार्यक्रमात अनाथ मुलींना पुरस्‍कार देण्‍याचे नाकारले !

मुली विवाहासाठी योग्‍य झाल्‍याचे कारण सांगत पुरस्‍कार देण्‍यास नाकारले

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – भारतासाठी पसार असणारा झाकीर नाईक याने पाकिस्‍तानातील एका सार्वजनिक कार्यक्रमात ‘अनाथ मुलीं’वर आक्षेपार्ह विधान केले आणि कार्यक्रम सोडून निघून गेला. या घटनेवरून सामाजिक माध्‍यमांतून झाकीरवर टीका केली जात आहे.

अनाथ मुलींना साहाय्‍य करणार्‍या ‘पाकिस्‍तान स्‍वीट होम फाउंडेशन’ या संस्‍थेने आयोजित केलेल्‍या कार्यक्रमामध्‍ये झाकीर नाईक याला अनाथ मुलींना पुरस्‍कार देण्‍यासाठी आमंत्रित करण्‍यात आले होते. या वेळी झाकीर नाईक म्‍हणाला, ‘‘तुम्‍ही (आयोजक) या मुलींना स्‍पर्श करू शकत नाही किंवा त्‍यांना ‘मुली’ म्‍हणू शकत नाही. त्‍या आता विवाहसाठी योग्‍य झाल्‍या आहेत.’’ यानंतर झाकीर या मुलींना पुरस्‍कार देण्‍याऐवजी तो कार्यक्रमातून निघून गेला. मुसलमान समाजामध्‍ये मुलीला मासिक पाळी आल्‍यानंतर तिला विवाहासाठी योग्‍य समजले जाते. त्‍या आधारावर झाकीर याने हे वक्‍तव्‍य केल्‍याचे समजते.

संपादकीय भूमिका

इस्‍लाममध्‍ये महिलांना नेहमीच दुजाभावाची वागणूक दिली जाते. त्‍याचे हे उदाहरण होय. इस्‍लाममध्‍ये महिलांवर करण्‍यात येणार्‍या अन्‍यायाविषयी स्‍त्रीवादी कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्‍या !