तुर्भे येथे आज माथाडी कामगारांचा ‘ऑनलाईन’ मेळावा !

माजी आमदार नरेंद्र पाटील

नवी मुंबई – महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबर या दिवशी तुर्भे येथील माथाडी भवनमध्ये माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती युनियनचे सरचिटणीस आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑनलाईन’ असलेल्या मेळाव्याला प्रथमच केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव उपस्थित रहाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कामगारमंत्री हसन मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या मेळाव्यात गुणवंत कामगारांना मान्यवरांच्या हस्ते ‘माथाडी भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.