कठोर शिक्षा होत नसल्यानेच गुन्हेगार गुन्हे करण्यास वारंवार धजावतात ! – संपादक

ठाणे, २४ सप्टेंबर (वार्ता.) – डोंबिवली येथील एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण ताजे असतांनाच कल्याणमध्ये ८ वर्षीय मुलीवर खासगी शिकवणीवर्गाच्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपी मुदर तालवाला याला अटक केली असून पुढील अन्वेषण चालू आहे. आरोपीला न्यायालयात उपस्थित केले असता त्याला १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पीडित मुलगी एका शिक्षिकेकडे शिकवणीला जाते. काही दिवसांपूर्वी शिक्षिका माहेरी गेल्याने तिचा पती शिक्षक मुदर तालवाला हा मुलांची शिकवणी घेत होता. काही दिवसांपासून पीडित मुलगी शिकवणीला जायला सिद्ध नव्हती. आईने शिकवणीला जायला सांगितल्यावर ती रडत असे. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर मुलीने घडलेला प्रकार हावभाव करून सांगितला. त्यानंतर वरील प्रकार उघडकीस आला. (असे प्रकार पहाता पालकांनीही सतर्क रहायला हवे ! – संपादक)
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !