बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता !
बेळगाव महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल ६ सप्टेंबर या दिवशी घोषित झाला. एकूण ५८ जागांपैकी ३५ जागांवर विजय मिळवत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसला १०, अपक्षियांना ८, महाराष्ट्र एकीकरण समितीला ४ जागा मिळाल्या आहेत