उपजतच ईश्वराची ओढ असणारे आणि निरपेक्षपणे लोकांना भक्ती करायला शिकवणारे पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज !
पू. बांद्रे महाराज यांच्या पुढील कार्याविषयी आणि पू. बांद्रे महाराज यांचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे भाऊ श्री. शिवराम बांद्रे यांच्याशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी केलेला वार्तालाप पाहूया. (पू. सखाराम बांद्रे महाराज यांनी २४.८.२०२१ या दिवशी देहत्याग केला.)