पंतप्रधान बेरोजगार भत्त्याच्या नावाखाली ‘एनी डेस्क टीम व्हूवर ॲप’ची माहिती ‘व्हॉटस्ॲप’द्वारे पाठवून लोकांची लूट !
ग्राहकांचे अधिकोष खाते रिकामे होण्याची शक्यता असल्याने लोकांनी सावध रहावे ! – पोलिसांचे आवाहन
ग्राहकांचे अधिकोष खाते रिकामे होण्याची शक्यता असल्याने लोकांनी सावध रहावे ! – पोलिसांचे आवाहन
पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा राज्य येथील युवा साधकांसाठी ‘ऑनलाईन’ कार्यशाळेचे आयोजन
‘द ललित’ या पंचतारांकित उपाहारगृहात चालू असलेल्या लसीकरण मोहिमेच्या वेळी लसीकरणाच्या नियमांचे पालन होत नसल्याने महापौर डॉ. किशोरी पेडणेकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
अत्यवस्थ रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सेवा देत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. ‘मार्ड’च्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू करण्यात आले आहे.
कराड शहरासह मलकापूर भागामध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरामध्ये ढगफुटी झाल्याप्रमाणे रस्त्यावरून पाणी वहात होते. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
येथील एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील दुकानांवरील कारवाई मागे घेण्यासाठी कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्याशी उद्धट वर्तन करून अरेरावी केली, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसमोर महिला पोलिसाशी गैरवर्तन केले.
जिह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. तिसर्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक प्रादुर्भाव होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. आता आम्ही कोरोनाच्या तिसर्या लाटेची पूर्वसिद्धता करत आहोत, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’ची रुग्णसंख्या १ सहस्र १२२ हून अधिक झाली आहे. याचसमवेत ‘म्युकरमायकोसिस’मुळे १०० जणांचा मृत्यू झाला आहे.
या दिवशी सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करावे असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
बाबू गेनू यांच्या जन्मस्थळाला पंतप्रधानांनी भेट देऊन श्रद्धासुमन अर्पण करावे, या मागण्यांचे निवेदन ‘ई-मेल’द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘सांडला कलश रक्ताचा’ या पुस्तकाचे लेखक प्रा. वसंतराव भालेराव यांनी पाठवले आहे.