
देवा, आला हा अज्ञानी जीव तव द्वारी ।
घेऊनी चरणी कृपा कर या जिवावरी ॥ १ ॥
या मायाजाळी हा जीव गुंतला आहे देवा ।
मायेतून सोडवून याला समष्टीसाठी घडवा ॥ २ ॥
या दगडाला देवा तूच दे आता आकार ।
या दगडाचे देवाच्या मूर्तीमध्ये कर रे रूपांतर ॥ ३ ॥
कसे आळवू रे तुजला, न कळे मजसी ।
घे रे हृदयासी या अपराधी जिवासी ॥ ४ ॥
भावाचा महासागर मनी निर्माण कर रे देवा ।
भावरूपी देव माझ्या अंतरात सत्वर यावा ॥ ५ ॥
देवा आता केवळ तूच माझी माता अन् पिता ।
तूच असे गुरुमाऊली अन् या साधनेतील सखा ॥ ६ ॥
गुरुमाऊली सदा करत असे कृपेची सावली !
प.पू. डॉक्टर ही असे आमुची गुरुमाऊली ।
सदा करत असे आमच्यावर कृपेची सावली ॥ १ ॥
सर्वांप्रती असे निरप्रेक्ष प्रेम तिच्या मनी ।
राहू दे आमचा भाव त्या माऊलीच्या चरणी ॥ २ ॥
सदा शिकवी ती आम्हा धरण्या कास अध्यात्माची ।
म्हणून आम्ही सर्व चालू शकतो वाट आज मोक्षाची ॥ ३ ॥
तळमळ द्या हो आम्हा ध्येयप्राप्तीसाठी ।
तरच पात्र होऊ तव चरणी पोचण्यासाठी ॥ ४ ॥
वेळ आली आता गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याची ।
कारण कृतज्ञतेविना
कोणतेच शब्द नाहीत आपुल्यापाशी ॥ ५ ॥
तुझेच रूप दिसावे या नयनी ।
गुरुचरणांचा ध्यास देऊनी अंतरी सजव या क्षुद्र मना ।
अनेक गुणांची वृद्धी करूनी घडवे रे या अंतःकरणा ॥ १ ॥
तुझ्या चरणांची ओढ लावोनी
व्याकूळ कर रे या हृदया ।
सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा करूनी
गाठता येऊदे तव चरणा ॥ २ ॥
शेवटी तुला मी शरण येऊनी तळमळीने करते प्रार्थना ।
प्रार्थनेकरता डोळे मिटूनी तुझेच रूप दिसावे या नयनी ॥ ३ ॥
– सौ. सायली करंदीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
दिंडी चालली, दिंडी चालली ।
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
गुरुस्तवन भावांजली : वैराग्यस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !