रस्त्यात सापडलेले दीड लाख रुपये परत करणारे सिंधुदुर्ग येथील प्रमोद हडकर !

तालुक्यातील वायरी, भूतनाथ येथे एका पर्यटन व्यावसायिकाचे रस्त्यात सापडलेले तब्बल दीड लाख रुपये येथील प्रमोद सावळाराम हडकर यांनी त्या व्यावसायिकाला परत केले. घरची परिस्थिती बेताची असलेल्या हडकर यांच्या या प्रमाणिकपणाविषयी त्यांचे गावात कौतुक केले जात आहे.

सरकारी पक्षाच्या नेत्यांना लैंगिक अत्याचाराची मोकळीक दिली आहे का ?

महिलांवरील अत्याचाराच्या विरोधातील ‘शक्ती’ हा कायदा हा केवळ फार्स आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना या कायद्यातील तरतुदी लागू होत नाहीत, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

(म्हणे) ‘आताच्या व्यवस्थेला घाबरून गप्प राहिलो, तर ते उद्या आपल्या घरापर्यंत पोचू शकतात !’

हत्यांचे लोण आपल्या घरात येण्याची चिंता करणारे दलवाई काश्मीर येथे हिंदूंचा वंशविच्छेद होत असतांना, इस्लामी आतंकवादामुळे शेकडोंनी बळी गेलेले असतांना कधी असे बोलले नाहीत. 

मतदानपूर्व चाचणीमध्ये बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार येण्याची शक्यता

एबीपी न्यूज आणि सी-व्होटर यांनी बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचे सरकार येणार असल्याचे म्हटले आहे.

राजीनामा केवळ दडपशाहीतूनच ! – सिनेट सदस्य विष्णु भंगाळे

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. पी.पी. पाटील यांचा राजीनामा !

नेवासे (जिल्हा नगर) येथे कहार समाज सेवा ट्रस्टच्या वतीने ‘हळदी-कुंकू’ समारंभाचे आयोजन

मुंबादेवी मंदिरात शिवजयंती आणि रथसप्तमी यांनिमित्ताने श्री. संतोष (भाऊ) पंडुरे यांच्या पुढाकाराने कहार समाज सेवा ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी ‘हळदी-कुंकू’ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

बनावट नोटा सिद्ध करणार्‍या धर्मांधाला ८ वर्षे सश्रम कारावास आणि ५० सहस्र रुपये दंड 

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, पोलिसांच्या पथकाने १९ मे २०१७ या दिवशी आरोपीच्या न्यू बायजीपुरा येथील घरी धाड टाकली होती. या धाडीमध्ये स्कॅनर, प्रिंटर, तर २ सहस्र रुपयांच्या २१३ बनावट नोटा, ५०० रुपयांच्या १५२ बनावट नोटा आणि १०० रुपयांच्या ९३ नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.

पुण्यातील विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या !

पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एन्.सी.एल्.) येथे पी.एच्.डी. करत असलेल्या सुदर्शन उपाख्य बाल्या बाबुराव पंडित या विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली आहे.

इंधन आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री सायकलवरून विधानभवनात जाणार !

इंधनाचे दर वाढल्याच्या निषेधार्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (१ मार्च या दिवशी) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि सर्व आमदार सकाळी १० वाजता मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकलवरून विधानभवन येथे जाणार आहेत.

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांनी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी न केल्यास गुन्हे नोंदवण्याचे आदेश !

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी न केल्यास थेट गुन्हे नोंद करा, असे निर्देश पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले.