मनुष्य संवेदनाहीन होत असल्याचे गंभीर उदाहरण !

पुणे – येथील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एन्.सी.एल्.) येथे पी.एच्.डी. करत असलेल्या सुदर्शन उपाख्य बाल्या बाबुराव पंडित या विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली आहे. याविषयी त्याचा चुलत भाऊ संदीप पंडित यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या विद्यार्थ्याचा तोंडवळा दगडाने ठेचून मृतदेह सूस येथील खिंडीत टाकून देण्यात आला होता. ही हत्या नेमकी कुणी केली आणि कोणत्या उद्देशाने केली, याचा शोध पोलीस घेत आहेत. अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली