नागपूर – कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी न केल्यास थेट गुन्हे नोंद करा, असे निर्देश पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले.
कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यानंतरही नागरिक चाचणी करत नाहीत. त्यामुळे प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी चाचणी केली का ? त्याचा अहवाल काय आला ? अहवाल निगेटिव्ह नसतांनाही तो शहरात फिरत आहे का ? याची माहिती घेण्यासह चाचणी न करणार्यांविरुद्ध साथरोग कायदा आणि आदेशाचे उल्लंघन आदी कलमान्वये गुन्हे नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
कोरोनाशी संबंधित नियमांचे काटेकोर पालन न केल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशी चेतावणी ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.